Sanjeevan Socio-Medical Foundation
Dr Sanjay B Ugemuge
(President)
A prominent name in the state's medical fraternity, Dr Sanjay Ugemuge, MBBS, MS (ENT), has been associated with several medical organizations including Indian Medical Association, Maharashtra Medical Council and All India Geriatric Society to name a few. He has attended many national and international medical conferences and presented papers, which were highly acclaimed. A multifaceted personality, he is associated with various medical, cultural and sports organizations. His burning desire to serve the society has resulted in the Sanjeevan Socio-Medical Foundation, which undertakes a number of social welfare projects. A helpline for senior citizens in Nagpur is also his brainchild. Besides running a charitable hospital at Sanjeevangram, he has been regularly conducting diagnostic and surgical camps in rural and tribal parts of Vidarbha
About Sanjeevan Socio-Medical Foundation
Sanjeevan is synonymous with serving those, who are in the autumn of their lives and seek help and compassion. Sanjeevan Socio- Medical Foundation is about a decade-and-a-half old while Sanjeevan Home for Aged would soon be completing a decade of its existence. The elderly people have a wealth of experience with which we can enrich our lives. However, in many homes, they are unfortunately considered a baggage as their 'utility quotient' dips with age. This state of being neglected gives them a feeling of sadness even as their dwindling physical abilities make them feel all the more helpless. With the noble cause of extending a helping hand to senior citizens, people from different walks of life came together and Sanjeevan Foundation came into being. It was primarily set up to look after the elderly, who find it impossible to live with their families for some reason or the other; those who choose to live in an old-age home; those who have no option other than living in one such home.
Sanjeevan pledges to serve such senior citizens. It has resolved to continue this mission banking on the society's generosity and compassion. Our horizons are expanding and we would humbly like to mention that whatever that has happened so far is only owing to generous contributions from the society.
आयुष्याच्या संध्याकाळी कुठल्याही व्यक्तीला गरज असते ती थोड्याफार मदतीची आणि त्याहून महत्वाचे म्हणजे चार प्रेमळ शब्दांची! सुमारे दीड दशका पासून संजीवन फाऊंडेशन याच विचाराने प्रेरित होऊन वाटचाल करीत आहे आणि संजीवन वृद्धाश्रम सुद्धा लवकरच एक दशक पूर्ण करेल.
खरे म्हणजे वृद्ध व्यक्ती त्यांच्या समृद्ध अनुभवभांडारातून अमूल्य रत्ने आपल्याला देऊन आपल्या आयुष्याला झळाळी प्रदान करू शकतात. परंतु दुर्दैवाने अनेक कुटुंबात वयोवृद्ध व्यक्ती त्यांची 'उपयोगिता' संपली अशा विचाराने दुर्लक्षित जीवन जगतांना दिसतात. पदरी पडलेल्या अशा गैरवर्तणुकीमुळे त्यांचे भावविश्व उध्वस्त झाल्याने अनेक वृद्ध व्यक्ती अत्यंत खिन्न वृत्तीने जीवन व्यतीत करतांना आढळून येतात. दिवसेंदिवस क्षय पावणाऱ्या शारीरिक क्षमतेमुळे त्यांच्या असहाय्यतेत भरच पडत असते.
अशा प्रकारे अगतिकतेची भावना घेऊन जगणाऱ्या वृद्ध व वडीलधाऱ्या मंडळींना मदतीचा हात देता यावा या पवित्र उद्देशाने समाजातील विविध क्षेत्रांतील सहृदय लोक एकत्र आले आणि संजीवन फाऊंडेशनचा जन्म झाला. तसेच ज्या जेष्ठ नागरिकांनी स्वखुशीने कुटुंबापासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे अथवा एकटे राहण्याशिवाय ज्यांच्याकडे पर्याय नाही अशा वृद्ध व्यक्तींसाठी आमची दारे कायम उघडी आहेत.
जेष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी संजीवन फाऊंडेशन कटिबद्ध आहे. समाजातील हृदयात सहानुभूती जोपासणाऱ्या व मदतीसाठी कायम पुढे येणाऱ्या व्यक्तींच्या मदतीने आमची वाटचाल सुरु आहे. आमचे क्षितिज विस्तारत असतांना आवर्जून हे सांगायचे आहे कीं आजपर्यंत जे काम करणे शक्य झाले आहे ते समाजातील विधायक शक्तींच्या सहभागाशिवाय शक्य झाले नसते. आम्ही आमच्या समस्त मदतकर्त्यांचे कायम ऋणी आहोत.
Sanjeevangram ::
A caring corner in the Sanjeevan Foundation premises, Sanjeevangram comprises the home for aged and other service projects.
Located 22 kms from Nagpur city on Hingna-Kanholibara Road, Sanjeevangram is nestled amid natural beauty. It offers solace to the elderly, who no longer have a home to call their own. It runs on charity and help received from a lot of people. It offers people at large an opportunity to worship at the altar of humanity.
There are several activities undertaken here to supplement this noble cause. Though built on charity, it seeks to be self-sufficient. At the same time, it wants to be a socially aware, culturally sound, and an environmentally responsible organisation.
In a nutshell, Sanjeevangram is a destination for every socially conscious and eco-friendly individual, who is looking at contributing to a life-positive activity
संजीवनग्राम हा संजीवन फाउंडेशनच्या विस्तीर्ण परिसराचा एक हळुवार व भावनाशील भाग आहे. वृद्धाश्रम आणि इतर सेवा प्रकल्प इथे आहेत. नागपूर पासून सुमारे २२ किमी अंतरावर हिंगणा-कान्होलीबारा रस्त्यानजीक निसर्गरम्य परिसरात संजीवनग्राम वसलेले आहे. ज्या जेष्ठ नागरिकांच्या नशिबी स्वतःच्या घराची ऊब नाही त्यांना येथे मायेचा ओलावा मिळतो. लोकसहभागातून तसेच समाजाकडून मिळणाऱ्या मदतीवर येथील प्रकल्प चालवले जातात. मानवतेची सेवा करण्याची सुवर्णसंधी या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीसाठी उपलब्ध आहे. जेष्ठ नागरिकांची सेवा व त्या अनुषंगाने विविध कार्यक्रम येथे आयोजित केले जातात. जरी जनसहभागातून येथे काम होत असले तरी स्वयंपूर्णतेकडे संजीवनग्राम वाटचाल करीत आहे. ते करीत असतानाच समाजाचे भान असणारी, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत व पर्यावरणाच्या बाबतीत डोळस अशी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. थोडक्यात सांगायचे तर आयुष्यात काहीतरी सकारात्मक करण्याची ज्यांची मनीषा आहे आणि समाज व पर्यावरणासाठी जे लोक योगदान देऊ इच्छितात त्यांच्यासाठी संजीवनग्राम एक उत्तम पर्याय आहे.
Our Activities
Independent Cottages
On either side of serpentine walkways beginning from the hillock are neat independent cottages. A financially strong but elderly person or a couple can choose to stay independently at these cottages. They can access all facilities and services of the old-age home and yet be in their own home
टेकडी जवळून सुरु होणाऱ्या नागमोडी रस्त्याच्या कडेला ऊभी असणारी टुमदार घरे पाहणाऱ्याला खुणावतात. आर्थिकदृष्ट्या सबळ असलेली जेष्ठ नागरीक व्यक्ती अथवा जोडपं या स्वतंत्र घरांत राहू शकतात. वृद्धाश्रमाच्या सगळ्या सेवा आणि सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध असतातच परंतु स्वतःच्या घरात राहण्याचे समाधान सुद्धा त्यांना मिळते
Sanjeevan Goshala
This Goshala was started to make Sanjeevangram self-sufficient. The cows and buffaloes here not only ensure a steady supply of milk for the Ashram but their waste is also used to produce bio-gas.The gas is used for cooking as well as to generate electricity. It is a source of rich manure for Ashrams fields and gardens
संजीवनग्राम स्वयंपूर्ण व्हावे ह्या हेतूने ही गोशाळा सुरु करण्यात आली. येथील गाई व म्हशींमुळे आश्रमाला दुधाचा नियमित पुरवठा तर होतोच परंतु त्यांच्या शेणाचा उपयोग बायोगॅस प्रकल्पासाठी होतो. प्रकल्पातून निर्माण होणारा गॅस स्वयंपाकाकरीता तसेच वीज निर्मिती साठी वापरला जातो. आश्रमाच्या शेती व उद्यान प्रकल्पांसाठी खत देखील या प्रकल्पा पासून मिळते
Sanjeevan Hospital
A fully-functional hospital exists on the campus. It has its own mobile healthcare van. Besides an OPD, it has a pathology laboratory, X-ray facility, an operation theater, and a physiotherapy unit. It is looked after by resident doctors and trained nurses. It regularly holds health camps, cataract surgery camps et al. Special attention is given to mother and child healthcare
आश्रमाच्या परिसरात रुग्णवाहिकेची सुविधा असलेले एक सुसज्ज रुग्णालय आहे. ओपीडी सुविधेव्यतिरिक्त, रुग्णालयात पॅथॉलॉजि लॅबोरेटरी, एक्स-रे मशीन, ऑपरेशन थिएटर तसेच फिजिओथेरपी युनिट अशा अनेक सुविधा आहेत. वैद्यकीय तज्ञ आणि नर्सेस रुग्णालयाचे कामकाज बघतात. स्वास्थ्य शिबिरे, मोती बिंदू शस्त्रक्रिया इत्यादी उपक्रम नियमितपणे येथे राबवले जातात. त्यासोबत परिसरातील माता व शिशूंच्या स्वास्थ्याकडे विशेष लक्ष दिल्या जाते
Sanjeevan Home for aged
Human beings are naturally drawn towards happiness and fulfillment. This is more so after a lifetime of struggle. A home of our own is at the centre of this quest. Sanjeevan provides just this to the elderly, who have become strangers in their own families. Set amid natural beauty, It is housed in a two-storey building occupying over 20,000 sq ft that has provision to accommodate 50 senior citizens. They are cared for by dedicated volunteers. The home is thoughtfully designed to look after the needs of the elderly. It has a kitchen, a dining hall, and a meditation area. On the upper floor are independent rooms.
मानव निसर्गतः आनंदाकडे व पूर्णत्वाकडे वाटचाल करीत असतो. आयुष्यभर झगडल्यावर त्याला आपल्या गंतव्याची जाणीव जास्त प्रकर्षाने होते. अशा मनःस्थितीतआपले स्वतःचे घर आनंदाचा ठेवा होऊ शकते. दुर्दैवाने काही जेष्ठ नागरिकांच्या नशीबी हे सुख नसते. संजीवन अशा मंडळींच्या जीवनात मायेची ऊब घेऊन येते. निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या या दुमजली इमारतीत ५० जेष्ठ नागरिक राहू शकतात. जागेचे एकूण क्षेत्रफळ सुमारे २०,००० स्क्वेअर फुटांवर आहे. समर्पित स्वयंसेवकांची चमू त्यांची देखभाल करते. जेष्ठ नागरिकांच्या आवश्यकता आणि गरजा लक्षात घेऊन संजीवनच्या वास्तूची उभारणी करण्यात आलेली आहे. तळमजल्यावर स्वयंपाकघर, जेवणाची खोली आणि ध्यानासाठी जागा आहे तर वरील मजल्यावर स्वतंत्र खोल्या आहेत
Shiv Temple & Dhyan Mandap
The campus has a magnificent temple of Lord Shiva located on a hillock. It offers religious and spiritual solace to senior citizens. The gongs of the temple and the chants of prayer spread tranquility around the campus. It has a magical coming together of peace and consciousness. Mindful Dhyan sadhana offers several physical and psychological benefits to older people, including better focus, enhanced calmness, less stress, and improved quality of sleep. It can even help adults come to terms with the challenges of ageing
टेकडीच्या माथ्यावर दिमाखात उभे असलेले भव्य शिवमंदिर पाहणाऱ्यांचे चित्त आकर्षित करते. आश्रमातील जेष्ठ नागरिकांसाठी हे स्थान अध्यात्मिक शांतीचे प्रतीक आहे. सकाळ आणि संध्याकाळी आश्रमाचा आसमंत मंदिरातील घंटारव व प्रार्थनांच्या ध्वनिलहरी यांनी भारलेला असतो. ध्यानसाधनेमुळे जेष्ठ नागरिकांना अनेक शारीरिक व मानसिक लाभ होतात. चित्तवृत्ती शांत होणे, ताणतणाव कमी होणे, झोप चांगली लागणे इत्यादी अनेक फायदे होतात. वाढत्या वयामुळे उद्भवणाऱ्या विविध प्रश्नांकडे धीरगंभीरपणे पाहण्याची वृत्ती निर्माण होते
Energy & Environment
Sanjeevan is aware of the need to preserve our environment. Sanjeevangram campus boasts greenery. It has attractive landscaping, huge plantations, a small pond, gardens, and lawns. Water and soil conservation programmes are undertaken here. This place is being developed on the lines of an ideal village.It should not only set an example for service to the needy but also in ideal use of resources at command. Apart from biogas and solar energy plants, it also has a wind energy turbine. Total 15KW power is produced here. Use of solar water heaters, solar street lights, solar home light system, solar cooker and solar pump has significantlyreduced the dependence on conventional energy
पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी संजीवन कटिबद्ध आहे. संजीवनग्राम च्या सभोवताली असलेली वृक्ष संपदा त्या कटिबध्दतेचे प्रतीक आहे. परिसराची आकर्षक मांडणी, विस्तीर्ण पसरलेली वृक्षराजी, छोटेखानी तळे, उद्याने आणि हिरवळ नैसर्गिक सौंदर्यात भर घालतात. अनेक जल आणि मृद संधारण कार्यक्रम येथे नियमितपणे आयोजित केले जातात. एक आदर्श ग्राम असे स्वरूप ही जागा धारण करत आहे. संजीवन केवळ गरजुंना दिल्या जाणाऱ्या सेवेसाठीच नव्हे तर उपलब्ध संसाधनांच्या उत्कृष्ठ वापर करण्या संदर्भात आदर्श प्रस्थापित करते. बायोगॅस आणि सौर ऊर्जा प्रकल्पासोबत येथे हवेवर चालणारे टर्बाइन आहे. एकूण १५ मेगावॅट वीज येथे निर्माण केल्या जाते. पाणी गरम करणे, रस्त्यावरील व घरातील दिवे, पंप, कुकर इत्यादी साठी सौर ऊर्जा वापरली जात असल्याने संजीवन पारंपरिक उर्जेवर फारसे अवलंबून नाही
Donation
:: Extend a helping hand
Sanjeevan is a multi-faceted project. It is not just an old-age home. It is a movement that is spreading the message of compassion, healthy life, and sustainable development. All this requires resources. That is why we seek your involvement and assistance. We have devised a number of ways in which you can be part of this endeavour
संजीवन केवळ वृद्धाश्रम नसून एक विविधांगी प्रकल्प आहे. खरे सांगायचे तर ही एक अशी चळवळ आहे जिच्या माध्यमातून सहानुभूती, स्वास्थ्यपूर्ण जीवन आणि दीर्घकालीन विकासाचा संदेश पोहोचविला जात आहे. या सगळ्या कामांकरीता संसाधनांची गरज असते. म्हणूनच आम्हाला तुमचा सहयोगाची आणि सहकार्याची आवश्यकता आहे. खालील कुठल्याही मार्गाने तुम्ही आम्हाला मदतीचा हात देऊ शकता
1) CORPUS ANNADAN FUND:
To ensure all the activities of the Ashram go on in an uninterrupted way, we are trying to build a corpus fund of at least Rs 1 crore. You may contribute to it as per your capacity
आश्रमातील विविध उपक्रम अबाधित सुरु राहावेत या उद्देशाने निदान एक करोड रुपयांचा निधी उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार यासाठी आर्थिक मदत करू शकता
2) A DAY IN ASHRAM :
Here is a novel and meaningful way in which you can celebrate birthday- anniversary or observe an occasion at Ashram. You can sponsor a meal for the elderly here on a specific day. All you need to do is make a donation of Rs 2100/- or supply food grains
वाढदिवस साजरा करण्याचा किंवा तुमच्यासाठी महत्वाचा असलेला एखादा दिवस अथवा घटना स्मरणीय करण्याचा एक अनोखा मार्ग आहे. तुम्ही त्या विशिष्ठ दिवशी येथील जेष्ठ नागरिकांसाठी जेवण प्रायोजित करू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त रुपये २१०० जमा करायचे आहेत किंवा त्या किमतीचे धान्य इत्यादी सामग्री द्यायची आहे
3) GOSHALA FUND :
You can donate to buy cows, fodder as well as veterinary care of the cattle at Ashram Goshala
गाय-म्हैस विकत घेणे, त्यांच्यासाठी चाऱ्याची व्यवस्था करणे अथवा त्यांची वैद्यकीय देखभाल करणे यासाठी तुम्ही आश्रमाच्या गोशाळेला आर्थिक मदत करू शकता
4) HEALTH FUND :
You can donate money for the activities of the hospital, give medicines or donate equipment for the hospital
येथील रुग्णालयातील कामकाजासाठी किंवा वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी तुम्ही आर्थिक मदत करू शकता तसेच औषधे दान करू शकता
5) ADOPTION SCHEME :
You can adopt an inmate of the old-age home and provide for all of his or her requirements.This will enable you to build a relationship beyond your family
आमच्या वृद्धाश्रमातील एखाद्या गरजू व्यक्तीची देखभाल करणे व त्या व्यक्तीच्या आवश्यक गरजा पूर्ण करणे याची जबाबदारी तुम्ही घेऊ शकता. त्यायोगे कुटुंबापलीकडे जाऊन एक माणुसकीचे नवीन नाते तुम्ही निर्माण करू शकाल
Gallery
This is a temple of humanity. The way you are taking every possible care of our senior citizens is certainly praiseworthy
Dr. Vikas Amte
You can feel a vibrant positive energy in the Ashram premises. Various service projects are being run very efficiently here
Shri Devendra Fadanvis
Such a good work indeed deserves everybody’s contribution. One should help Sanjeevan to the best of their ability